देवगड,दि.२५ ऑगस्ट
अ.कृ.केळकर हायस्कूल वाडा तालुका देवगड या ठिकाणी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६-२७ स्पर्धेमध्ये शेठ म.ग. हायस्कूल देवगडने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे .विजेत्या संघाला स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झालेली आहे.
या संघामध्ये शुभ्रा हितेश कुबल,कस्तुरी दीपक कांबळी,गार्गी अतुल वाडकर, अनन्या गणेश जोशी, ओम वैभव मेस्त्री, मयंक योगेश धुरी, सम्यक महेश सकपाळ, हर्ष ध्वजेंद्र मिराशी, गौरव तुकाराम जोशी, मंथन विनोद मेस्त्री या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या नाटिकेचे लेखन आज्ञा अभिषेक कोयंडे तर नेपथ्य आणि दिग्दर्शन अभिषेक नरहरी कोयंडे यांनी केले होते. या विजयी संघाचे संस्थेचे पदाधिकारी , शाळा समितीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत शिंगाडे, मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका सौ. निशा दहिबावकर ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने आणि पालक वर्गाने अभिनंदन केलेले आहे.
या नाट्य स्पर्धेसाठी दीक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष श्री निरंजन दीक्षित यांनी बहुमोल सहकार्य केले.