देवगड : आंबा-काजू बागायतदारांना सरसकट नुकसानभरपाई द्या; देवगड पंचायत समितीत ठराव

शेअर करा

देवगड,दि.२८ जुलै

देवगड तालुक्यात यावर्षी सर्वच आंबा व काजू बागायतदार यांना नुकसानीचा पहिल्यांदाच सर्वाधिक फटका बसला आहे त्यामुळे विमा कंपनीने सर्वच मंडळात नुकसान भरपाई द्यावी असा ठराव पंचायत समितीच्या आजच्या मासिक बैठकीत सदाशिव ओगले यांनी मांडला. त्याचप्रमाणे कोणतीही सबब पुढे न करता शासनाची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळावी. अशी आग्रही मागणी त्यांनी केली.


देवगड पंचायत समितीची मासिक सभा आज सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली .यावेळी व्यासपीठावर उपसभापती अमोल लोके प्रभारी गटविकास अधिकारी निलेश जगताप जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अधिकारी राजेंद्र सावंत तसेच तालुक्यातील सर्व सदस्य व अधिकारी उपस्थित होते.


तालुका कृषी विभागाचा आढावा घेताना सदस्य सदाशिव ओगले यांनी तालुक्यात आंबा नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना कधी प्राप्त होणार असा सवाल करून सद्यस्थिती सांगावी अशी मागणी केली असता तालुका कृषी अधिकारी यांनी आंबा नुकसानीची शासनाकडून मिळणारी रक्कम लवकरात लवकरअदा करण्यात येईल . इ केवायसी ची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण होताच संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर रक्कमा अदा होतील.असे स्पष्ट केले हाच धागा पकडून सदाशिव ओगले यांनी आंबा नुकसानीबाबत विमा कंपनीकडून कोणत्या मंडळामध्ये रक्कमा जाहीर केले आहेत याबाबत विचारणा केली असता बापर्डे व देवगड भागात आंबा नुकसानाची रक्कमा विमा कंपनीने दिलेला नाहीत काही ठिकाणी काजू ना तर काही ठिकाणी आंबा बागायतदारांना रक्कमा विमा कंपनी देणार असतील तर ते चुकीचे आहे तालुक्यात यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात सर्वच बागायतरांचे नुकसान झाले आहे ही बाब लक्षात घेऊन विमा कंपनीने आंबा व काजू बागायत दारांना सदर नुकसानी भरपाई द्यावी अशी मागणी करत तसा ठराव मांडला


तालुक्यात बोगस वैद्यकीय अधिकारांची पुढील बैठकीत माहिती द्यावी अशी मागणी रवींद्र तिर्लोटकर यांनी केली. तर तालुक्यात सर्वच ठिकाणी बोगस वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय लक्षात घेऊन शासनाने सर्व प्राथमिक आरोग्यंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावी अशी मागणी सादिक डोंगरकर यांनी केली तसेच भात लावण्याचा शेवटच्या टप्प्यातील हंगाम चालू असून सर्प दशावरील वरील औषधे सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा प्रमानात तैनात ठेवावी.याकडे उपसभापती अमोल लोके यांनी लक्ष वेधले


पावसाळी हंगामात बऱ्याचशा एसटी बसेस काही मार्गावरील बंद करण्यात आल्या आहेत त्यात खारेपाटण कडेजाणारी शालेय फेरी देखील असून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे याकडे विष्णू घाडी यांनी लक्षवेधून ती त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी केली तर सलोनी तळवडेकर यांनी ग्रामीण भागात अरुंद रस्ते व त्यावरील असलेल्या दुतर्फा झाडी अद्याप तोडल्या नसल्याने पादचाऱ्याना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत सभापती गणेश राणे यांनी चतुर्थी पूर्वी रस्त्यावरील खड्डे व झाडीझुडपे बांधकाम विभागाने ही कामे मार्गी लावावी अशा स्पष्ठ सूचना दिल्या.


जिल्हा परिषदेचा बांधकाम विभागाचे सुमारे 10 कोटीची रक्कम खर्च न झाल्याने मागे गेली.सदाशिव ओगले यांनी ही बाब खरी आहे का असा सवाल यावेळी केला.त्याला जि . प.चे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांनी ऑगस्ट 2024 पासून शासनाच्या निकषांमध्ये दोन वर्ष ऐवजी एक वर्षात रक्कम खर्च करण्याच्या नवीन नियमावलीमुळे सदर रक्कम मागे गेली असून ती परत मिळण्यासाठी पाठपुरावा चालू असल्याचे सांगितले.त्याच प्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना बंद झाल्याचे यावेळी सांगण्यात आले त्याऐवजी नवीन योजना सुरू करण्यात आली असून त्याचे सर्व निकष पूर्वीप्रमाणेच असतील असे स्पष्ट करण्यात आले मात्र गेल्या सहा-सात वर्षात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेमधून गुरांचे गोठे शेतकऱ्यांनी बांधूने त्यांना त्यांचे रक्कमा मिळालेले नाहीत.काही तांत्रिक बाबींमुळे अनेक शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागला असा आरोप यावेळी करण्यात आला.


पशुसर्धन विभागाने तालुक्यात मोकाट गुराबाबत माहिती घेऊन संबंधित मालक याबाबत अहवाल सादर करावा.असा आदेश सभापती गणेश राणे यांनी दिला.याबाबत सदस्या सलोनी तळवडेकर यांनी देवगड ते शिरगाव या मार्गावर मोठया प्रमाणात मोकाट गोरे असून त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. ही गंभीर बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना आखावी अशी मागणी केली.यावेळी अन्य प्रमुख खातेंचा आढावा घेण्यात आला.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ घोगळे यांनी जटिल शस्त्रक्रिया करून गाय व वासराला जिवदान दिल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

शेअर करा