सावंतवाडी,दि.२७ जुलै
एकतेमध्ये प्रचंड ताकद आणि यश असते हे शनिवारच्या जंतर-मंतर वरील तरूणाईच्या आंदोलनातून दिसून आले आहे,राष्ट्रीय मिल मजदूर संघाने गिरणी कामगार प्रश्नावर यापूर्वीच लढाऊ बाणा स्वीकारला असला तरी गिरणी कामगारांना आता मोठ्या संख्येने आंदोलनात उतरावे लागेल,असे प्रतिपादन भारत सरकारच्या श्रम रोजगार मंत्रालयाचे माजी उपसंचालक प्रदीप के मून यांनी येथे कामगार कर्मचा ऱ्यांच्या शैक्षणिक शिबिरात बोलताना केले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या विद्यमाने खंडाळा येथील गं.द.आंबेकर शैक्षणिक केंद्रामध्ये शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवशीय शैक्षणिक शिबिर पार पडले.त्यावेळी प्रदीप मून मान्सून प्रशिक्षण शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
संघटनेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे उपसभापती आमदार सचिन अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी या शिबिराला शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी द्रुकश्राव्य माध्यमातून शिबिरार्थीशी संवाद साधताना म्हटले आहे की, संस्थेचे आद्य संस्थापक स्वर्गीय गं. द. आंबेकर यांनी कामगारांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास व्हावा यासाठी खंडाळा येथील नैसर्गिक दृष्ट्या सक्षम असे स्थळ निवडले. परंतु आता कामगारांनी कामगार शिक्षणाच्या माध्यमातून आपली उन्नती साध्य केली पाहिजे.
प्रदीप मून शिबिरार्थीना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले,दिशा बदलतात तशी कृतीही बदलत गेली पाहिजे.जो आयुष्यात नकारात्मकतेला बाजूला सारून सकारात्मकता आत्मसात करतो तोच आयुष्यात हमखास यशस्वी होतो.ते असेही म्हणाले,आजच्या काळात स्वतःला बदलता आले पाहिजे. माणूस जोडत गोला तर शब्दाला सामर्थ्य निर्माण होते.आपल्या भाषणात प्रदीप मून यांनी माणसाची आर्थिक घडी आणि जीवनात भेडसवणा-या अनेक समस्यांवर उपयुक्त माहिती दिली.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेंकर,सुनील बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे यांनी आपल्या भाषणात, एनटीसी गिरणी कामगारां चे प्रश्न संघोटनेचे नेतृत्व यशस्वीरित्या सोडवील,असा विश्वास व्यक्त केला.संघटनेच्या शिक्षण विभागाचे उपप्रमुख मोहन पोळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.संघटनेच्या ग्रंथपाल ममता गाडी, सेवा दलाचे सुरेश मोरे यांनीही चर्चेत भाग घेतला. शिबिराला कामगार प्रतिनिधीसह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी.बी. गावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले