देवगडमध्ये ब्रह्मकुमारी शाखेचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात

शेअर करा

ज्येष्ठ उद्योजक नंदकुमार घाटे यांना राखी बांधून दिला बंधुभावाचा संदेश


देवगड,दि.२८ ऑगस्ट

भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि अतूट स्नेहाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असतानाच देवगड येथील ब्रह्मकुमारी शाखेच्यावतीने रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.


रक्षाबंधनाच्या निमित्ताने ब्रह्मकुमारी शाखेच्या वतीने ज्येष्ठ उद्योजक नंदकुमार घाटे यांना राखी बांधण्यात आली. यावेळी रक्षाबंधनाच्या माध्यमातून प्रेम, बंधुभाव, सद्भावना आणि समाजातील परस्पर स्नेह वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे कार्यक्रमस्थळी आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.


रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित नसून, एकमेकांप्रती प्रेम, विश्वास, संरक्षण आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देणारा सण आहे. या भावनेतून ब्रह्मकुमारी शाखेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.


यावेळी सुधीर मांजरेकर, सुरेश सोनटक्के, दत्तात्रय बलवान, अनिल साटम, गुरुदेव परवडेकर, शामल जोशी, विमल बलवान यांना देखील राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला यावेळी ब्रह्मकुमारी शाखेच्यावतीने मेघा दीदी, विजय बोडस, अपर्णा बोडस, संजय मालंडकर उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ उद्योजक नंदकुमार घाटे शामल जोशी मेधा दीदी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले गेली पंधरा वर्षे हा उपक्रम राबवत असताना खूप आनंद होतो असा विश्वास देखील मेधा दीदी यांनी व्यक्त केला

शेअर करा