देवगड : किंजवडे येथे दुग्ध व्यवसाय वृद्धी अभियानांतर्गत सहा सूत्री कार्यक्रम

शेअर करा

ग्रामपंचायत किंजवडे व नंदिनी दुग्ध संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन; पशुपालकांना दुग्ध व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन

देवगड,दि.०८ सप्टेंबर

देवगड तालुका दुग्ध व्यवसाय वृद्धी अभियानांतर्गत सहा सूत्री कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत किंजवडे आणि नंदिनी दुग्ध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींसह कृषी व पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच दुग्ध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला जि. प. सदस्या सौ. सावी गंगाराम लोके, सभापती गणेशजी राणे, जि. प. सदस्य सुनीलभाई पारकर, जि. प. सदस्य देवदत्त कदम, पं. स. सदस्या सौ. संजना संजय लाड, समृद्धी चव्हाण, सौ. सलोनी तडवडेकर, उपसरपंच पडावे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच , डॉ. आदिनाथ चव्हाण, पशुधन पर्यवेक्षक सचिन घाडी, सचिन पाटील, वैभव शारबिद्रे, ज्ञानराज मुंडे, के. बी. राणे, शीतल सहाणे, गायत्री राय, अभय करंबेळकर, गोकुळ संघाचे राजेश गावकर, परिचर विकास कदम आणि आउटसोर्स व्हॅक्सिनेटर रोहित तेली आदी उपस्थित होते.

दुग्ध व्यवसायाला चालना देणे, पशुपालकांचे उत्पन्न वाढविणे तसेच आधुनिक पद्धतींचा अवलंब करून दुग्ध उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने या सहा सूत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पशुपालकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमामुळे परिसरातील पशुपालकांना दुग्ध व्यवसायातील विविध शासकीय योजना, पशुधनाचे आरोग्य, लसीकरण तसेच दुग्ध उत्पादन वाढीसाठी आवश्यक बाबींची माहिती मिळाली. त्यामुळे या अभियानाचा ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

शेअर करा