कुणकेश्वर मंदिरातील वार्षिक धार्मिक कार्यक्रमासाठी भाविकांनी सहकार्य करावे

शेअर करा

३० व ३१ ऑगस्टला भावई वार्षिकानिमित्त दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद

देवगड,दि.२७ ऑगस्ट

श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर यांच्या वतीने भाविक भक्त आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी देवस्थानचे दादरा वार्षिक आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कुणकेश्वर मंदिर परिसर भाविकांसाठी बंद राहणार आहे.


या कालावधीत कुणकेश्वर महापुरुष पार ते कुणकेश्वर मंदिर, मारुती मंदिर तिठा ते कुणकेश्वर मंदिर तसेच मिठमुंबरी बीच ते कुणकेश्वर मंदिर या मार्गांवरील रस्तेही बंद ठेवण्यात येणार आहेत.


तसेच सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत भावई वार्षिक होणार आहे. त्यामुळे या एक तासाच्या कालावधीत मंदिरातील दर्शन व्यवस्था बंद राहणार असून, वार्षिकीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.
भाविक भक्त आणि पर्यटकांनी या वेळेची नोंद घेऊन नियोजन करावे तसेच देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ केशव तेली यांनी केले आहे

शेअर करा