दोडामार्ग : घोटगेवाडी कॉजवेवरून वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला; तरुणाचा शोध अद्याप सुरू

शेअर करा

१८ तासांनंतर प्रशासनाची शोधमोहीम; स्थानिक रेस्क्यू टीम व नागरिकांच्या मदतीने अडीच तासांत मुलाचा मृतदेह आढळला

दोडामार्ग,दि. १८ ऑगस्ट

घोटगेवाडी काॅजवेवरून वाहुन गेलेल्या तरुण तसेच लहान मुलगा यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून चक्क अठरा तासानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. बाबल अल्मेडा टिम तसेच सह्याद्री अ ॅडव्हेंचर रेस्क्यू टिम आंबेली सांगेली तसेच स्थानिक नागरिक यांनी शोध मोहीम सुरू केली प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची बोट नाही यामुळे अखेर राजेंद्र निंबाळकर, स्वप्नील निंबाळकर यांनी दोन रबर बोट उपलब्ध करून दिल्या या शोध मोहीम मध्ये दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव सहभागी झाले अडीच तासाच्या शोध मोहीम दरम्यान वाहुन गेलेला मुलगा रेणण दिलीप बडा या मुलाचा मृतदेह घोटगे काॅजवे जवळ झाडाला अडकलेल्या स्थितीत आढळून आला तो बोटीतून परमे पुलाजवळ आणला तर दुसऱ्या तरूणांचा शोध लागला नाही. दोडामार्ग पोलीस निरीक्षक जलसंपदा अधिकारी उपस्थित होते शोध मोहीम दरम्यान धरणातून पाणी विसर्ग बंद केल्याने शोध घेणे शक्य झाले. मुलाचा मृतदेह मिळताच कुटुंबातील सदस्य यांनी एकच आक्रोश केला.

शेअर करा