Sawantwadi News :कोलगाव निरुखे शाळेतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार; विहिरीसाठी निधी मंजूर

शेअर करा

जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ मध्ये विहिरीसाठी निधी मंजूर; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, विद्यार्थी-शिक्षकांना दिलासा!

सावंतवाडी,दि.०३ नोव्हेंबर

कोलगाव निरुखे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. पाण्याचे प्रमाण अपुरे असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेत विद्यार्थ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला.

विद्यमान आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या माध्यमातून शाळेसाठी विहीर बांधण्याकरिता निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरच पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विहिरीच्या कामामुळे शाळेतील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

या कामासाठी शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश पवार, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिकले, रोहित नाईक, आशिका सावंत, उगवेकर, अभिजित टिकले, विजय टिकले, संजय पवार, सुशांत ठाकूर, विवेक टोपले, विदेश धरी, शीतल टिकले, गौरव कडाळकर, मुकेश ठाकूर युवराज राणे राजेंद्र निर्गुण आदेश गावडे रविकिरण राऊत नजीर शेख योगिनी करमळकर दिलेश जाधव भैय्या राऊत आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

शेअर करा