दोडामार्ग बांदा आयी मार्गावर धोकादायक झाडे तोडायला सुरूवात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपोषण मागे

शेअर करा

दोडामार्ग, दि. १५ आॅगस्ट

सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या क्षेत्रात येणाऱ्या दोडामार्ग ते बांदा दोडामार्ग ते आयी मार्गावर मोठया प्रमाणात धोकादायक झाडे वाढलेली होती यात काही जीर्ण झाडे समावेश होता. ही झाडे पडून अपघात होणे वाहतूक बंद होणे सारख्या घटना घडत होत्या. ही झाडे तोडावी यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष गुणाजी गवस यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. अखेर बांधकाम विभाग अधिकारी सीमा गोवेकर, संभाजी घंटे इतर कर्मचारी


यांनी गुणाजी गवस समवेत चर्चा केली तसेच धोकादायक जीर्ण झाडे तोडायला सुरूवात केली आहे. याचे फोटो सादर केले. शिवाय झाडे तोडायला सुरूवात केली आहे. असे लेखी पञ सार्वजनिक बांधकाम विभाग कडून देण्यात आले यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गुणाजी गवस, सुधीर चांदेलकर यांनी उपोषण स्थगित केले.

शेअर करा