श्रावणातील सत्यनारायण महापूजेनिमित्त मोटारसायकल पायलटांचा धार्मिक कार्यक्रम
धारपी येथील भजन मंडळाच्या सादरीकरणाने भक्तिमय वातावरण; भाविकांचा मोठा प्रतिसाद
दोडामार्ग, दि. १५ आॅगस्ट
दोडामार्ग शहरातील एक जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या श्री देव पिपंळेश्वर देवस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रम श्रावण महिन्यात तसेच इतर वेळी सादर केले जातात श्रावण महिन्यात दोडामार्ग शहरातील मोटार सायकल पायलट, रिक्षा चालक, टेम्पो चालक कडून सत्यनारायण महापूजा इतर कार्यक्रम आयोजित केले जातात मोटार सायकल पायलट यांनी आयोजित पूजेत धारपी येथील भजन मंडळ याना निमंत्रित केले होते. त्यांनी सादरीकरण केलेल्या भजनाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
दरवर्षी श्रावण महिन्यात देव पिपंळेश्वर देवस्थान येथे सत्यनारायण महापूजा आयोजित केली जाते. प्रथम मोटार सायकल पायलट वर्गणी काढून हा धार्मिक कार्यक्रम पार पाडतात यावेळी देखील श्रावण महिन्यात पहिली सत्यनारायण महापूजा मोटार सायकल वतीने करण्यात आली. यात सर्व पायलट व्यवसाय बंद ठेवून सहभागी झाले होते.
पिपंळेश्वर देवस्थान येथे आकर्षक विधुत रोषणाई केली होती भगवे पताके तसेच सत्यनारायण महापूजा पूजा मकर सजवण्यात आला होता. पायलट मधिल एका दाम्पत्याला पूजेचा मान दिला होता. सत्यनारायण महापूजा आरती तीर्थ प्रसाद सायंकाळी धारपी येथील भजन मंडळ यांनी सादर केले. यावेळी भजन ऐकायला मोठी गर्दी झाली होती. भजन मंडळाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.