माघारी नेताना आडाळीत हत्ती दुकानात शिरला; कळणे नदीपात्रात ठाण मांडल्याने वन कर्मचाऱ्यांची काठावर प्रतीक्षा
दोडामार्ग, दि. ३० आॅगस्ट
तिलारी खोऱ्यातील पाळये, सोनावल, मोर्ले, केर, घोटगे, दरम्यान वावर असलेल्या जंगली हत्ती कळपातील हत्ती गेल्या आठवडयात कळपातून बाहेर पडत पुन्हा गोवा मोपा पेडणे तालुक्यात दाखल झाला होता. गोवा येथून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा माघारी पाठवला यामुळे चवताळलेल्या ओंकार हत्तींने कारवर हल्ला चढवला होता. ओंकार पुन्हा डेगवे मोरगाव असा प्रवास करत पुन्हा कळपात सामिल करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. रविवारी ओंकार हत्ती चक्क दुकानात शिरला. या नंतर तो कळणे नदी पाञात पाण्यात मनसोक्त मजा करण्यासाठी ठाण मांडल्यामुळे वन कर्मचारी यांना बराच वेळ प्रतिक्षा करावी लागली.
दोडामार्ग तालुक्यात जंगली हत्ती उपद्रव मुक्त करा अशी मागणी करून देखील वन विभाग कडून प्रयत्न होताना दिसत नाही यामुळे दर दिवशी शेतकरी बांधवांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. कळपात बाहुबली सोबत ओंकार हत्तीचे पटत नाही यामुळे या अगोदर देखील तीन वेळा ओंकार हत्ती तो गोवा बांदा, इन्सूली, प्रवास करत माघारी परतला होता.

मोर्ले केर दरम्यान ओंकार कळपात सहभागी देखील झाला होता. पण गेल्या आठवडयात तो पुन्हा सासोली, भिकेकोनाळ, मार्गे कळणे, फोंडये, डिंगणे ते मोपा पर्यंत गेला होता नंतर डिंगणे गावात देखील गेला होता. गोवा येथून हाकलून लावले होते. नंतर डेगवे दोडामार्ग ते बांदा मुख्य रस्त्यावर देखील ओंकार दाखल झाला यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

ओंकार हत्तीला पुन्हा कळपात सामिल करण्यासाठी वन विभाग टिम कामाला लागली आहे. केळी तसेच इतर खाद्य दाखवत ओंकार हत्तीला रस्त्यावरून चालत चालत मोरगाव, आडाळी, कळणे, भिकेकोनाळ, प्रवास सुरू असताना आडाळी माऊली मंदिराच्या ठिकाणी शाळेसमोर एका दुकानात शिरुन दुकानातील पिशवी उचलली. या नंतर त्याला वन कर्मचारी टिम यांनी कळणे गावात आणले.
भिकेकोनाळ मार्गे कुंब्रल, शिरवल, केर मोर्ले या मार्गे ओंकार हत्तीला कळपात नेण्यासाठी कळणे उगाडे रस्त्यावर ओंकार हत्तीला पुढे पुढे नेत असताना नदी पाञात उतरला असता तो नदी पाञात ठाण मांडून मनसोक्त डुबकी मारत तेथील झाडाची फांदी सोंडेने वरखाली करत अंग घासत होता बरेच दिवस पाणी न मिळाल्याने ओंकार नदी पाञात चांगला रमला.