दोडामार्ग : तेरवण गावी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात केला साजरा.

शेअर करा

दोडामार्ग, दि. १५ आॅगस्ट
दोडामार्ग तालुक्यातील तेरवण गावात
प्रथम सत्रातील कार्यक्रमात जि. प.शाळा तेरवण नंबर १ मध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी भारत देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण करत मोठ्या उत्साहात साजरा केला.
त्यानंतरच्या पुढील कार्यक्रमात
१९७१ च्या युद्धातील शहीद जवान कै. लक्ष्मण गोपाळ गवस यांच्या स्मारकाकडे जाऊन ध्वजारोहण करत सर्वांनी हुतात्म्याला पुष्पचक्र अर्पण करत मोठ्या आदराने श्रद्धांजली वाहिली. या समयी गोपाळ गवस व तुकाराम गवस या माजी फौजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.सामूहिक राष्ट्रगीता नंतर भारत मातेचा जय जयकार करत
व अमर जवानाच्या नावाच्या घोषणांनी संपूर्ण परिस घुमला. या कार्यक्रमास निवृत्त फौजी सचिन गवस, माजी पोलीस पाटील अशोक कांबळे, जयराज, तुकाराम, सदाशिव, मनोहर, सौ. माला, शारदा,दुलवंती, शांती तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिठाई वाटून सर्वांच तोंड गोड करत कार्यक्रमाची सांगता झाली

शेअर करा