जनतेच्या सोयीसाठी नगरपंचायत कडून योग्य नियोजन
दोडामार्ग, दि. २८ आॅगस्ट
कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत वतीने शहरातील नागरीकांना अनेक सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत . शासनाचे उपक्रम राबवले जात आहेत. शुक्रवारी कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत वतीने सक्शन वाहन, कन्वेयर बेल्ट, डस्ट रिमुवल, शेडिंग मशीन, लोकार्पण करण्यात आले. कसर्ई दोडामार्ग शहरातील नागरीकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायत प्रयत्न करत आहेत. सरकारच्या सहकार्याने हे शक्य होत आहे. असे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सांगितले.

कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत कडे सक्शन वाहन उपलब्ध नसल्याने सुलभ शौचालय मधिल मलनिस्सारण करण्यासाठी सावंतवाडी येथून वाहन बोलवावे लागत असे, कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत वतीने सुरुवातीला सक्शन वाहन खरेदी केली होती पण त्याला टॅक्टर जोडला यामुळे उपयोग शुन्य झाला होता. या नंतर नगरपंचायत कडून नवीन सक्शन वाहन मिळावे यासाठी प्रस्ताव पाठवला होता यामुळे काही महिन्यांपूर्वी हे सक्शन वाहन उपलब्ध करून दिले होते याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी पार पडला, यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देवीदास गवस, मुख्य कार्यकारी अधिकारी, संकेत गायकवाड, सभापती संजना संतोष म्हावळणकर, सौ पार्सेकर,ज्योती जाधव, सौ जाधव, स्वीकृत नगरसेवक, समीर रेडकर, व्यापारी संघ अध्यक्ष सागर सिरसाट, प्रणय मोरजकर तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.