दोडामार्ग,दि.३० ऑगस्ट
सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी दोडामार्ग येथील जि. प. केंद्रशाळा दोडामार्ग नं. १ या शाळेला भेट देऊन शाळेतील क्रीडा सुविधा, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या क्रीडा साहित्याची तसेच विविध उपक्रमांची पाहणी केली.
यावेळी शाळेच्या विविध गरजा आणि विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील सहभागाबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.
यावेळी जि. प. सदस्य दीपक गवस, वरिष्ठ लेखा सहाय्यक सुरेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुमित दळवी, ओबीसी मोर्चा सरचिटणीस आनंद तळणकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत आदी उपस्थित होते.