दोडामार्ग : सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ते दोडामार्ग तिलारी गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर बसेस सुरू करा – बाबुराव धुरी

शेअर करा

दोडामार्ग, दि. १ सप्टेंबर

मुंबई या ठिकाणी राहाणारे दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावातील चाकरमानी हे थीवी तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनस या ठिकाणी उतरतात पण येथून दोडामार्ग तिलारी या ठिकाणी येतात पण सावंतवाडी येथून दोडामार्ग ठिकाणी येणारी बस उपलब्ध नसते तेव्हा गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी याना घरी पोहचता आले पाहिजे यासाठी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ते दोडामार्ग तिलारी एस टी बस सेवा सुरू करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे माजी जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी एस टी विभाग कडे केली आहे. तसेच निवेदन दिले आहे.


मुंबई, दादर, ठाणे, अंधेरी, बोरीवली, डोंबिवली, नवी मुंबई, या ठिकाणी दोडामार्ग तालुक्यातील हजारो चाकरमानी राहतात गणेश चतुर्थी सणाला गावी येतात पण रेल्वे मिळत नाही यामुळे काही जण अनेक रेल्वे पकडून सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनस या ठिकाणी उतरतात पण थेट बस सेवा उपलब्ध नसल्याने या चाकरमानी भक्तांना सावंतवाडी ते दोडामार्ग असा प्रवास करावा लागतो.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ते मुंबई गोवा महामार्ग बांदा दोडामार्ग ते तिलारी एस टी बस सेवा गणेश चतुर्थी सणाच्या काळात सुरू केली तर याचा थेट लाभ चाकरमानी याना होणार आहे. तेव्हा ११ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर पर्यंत बसेस सुरू करा अशी मागणी बाबुराव धुरी यांनी केली आहे.

शेअर करा