दोडामार्ग : तिलारी धरणाच्या पातळीत वाढ धरणाचे अतिरिक्त पाणी शुक्रवारी नदी पाञात सोडण्यात येणार नदी किनारी गावांना सावधानतेचा इशारा

शेअर करा

दोडामार्ग, दि. २३ जुलै

महाराष्ट्र गोवा या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे धरणातील अतिरिक्त पाणी कोनाळ पुच्छ कालवा सांडव्यातून तिलारी नदी पाञात सोडले जाणार आहे. तेव्हा नदी काठच्या गावातील ग्रामस्थ यांनी खबरदारी घ्यावी कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी, किंवा, गुरे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन जलसंपदा विभाग तिलारी उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे यांनी एका प्रसिद्ध पञकाध्दारे कळविले आहे.

तिलारी धरणाच्या परिसरात
२०/०७/२०२६ पासून तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अती पर्जन्य वृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरणाच्या ROS व GOS नुसार धरणक्षेत्रातील पाणलोट क्षेत्रामधुन येणारे अतिरीक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने दि. २४/०७/२०२६ रोजी खळग्यातील दगडी धरणाच्या सांडव्यावरून अतिरीक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार असल्याने तसेच सद्यस्थितीत धरणाच्या परीसरात पावसाचे प्रमाण वाढले असल्याने धरणक्षेत्रा बाहेरील पाणलोट क्षेत्र, खरारी नाल्यातील पाणी नदी पात्रात येवून नदी पात्राची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.

दोडामार्ग, दि. २३ जुलै प्रतिनिधी