दोडामार्ग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व दुकानांचे नियोजन

शेअर करा

नगरपंचायतीतर्फे चारही प्रमुख रस्त्यांची पाहणी; वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा


दोडामार्ग, दि. २८ आॅगस्ट

कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत वतीने शुक्रवारी आगामी गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत मध्ये नियोजन संदर्भात बैठक पार पडली चारही रस्त्यावर कशा पद्धतीने नियोजन करणे, तसेच बाजारपेठ मध्ये बसणारे फिरते व्यापारी, भाजीपाला, विक्री बाबत तसेच रिक्षा , थांबा एस टी बस पार्किंग, वाहने पार्किंग, गणेश चतुर्थी काळात अवजड वाहने वाहतूक नियोजन बाबत चर्चा करून नंतर दोडामार्ग बाजारपेठ मध्ये व्यापारी याना दिड ते तीन मीटर अंतरावर दुकाने लावणे याबाबत आखणी करण्यात आली.
कसर्ई दोडामार्ग शहरात गणेश चतुर्थी सणाच्या काळात मोठी गर्दी होते, गोवा तसेच इतर जिल्ह्यातील राज्यातील लोक स्थानिक नागरिक दोडामार्ग शहरात मधून येजा करतात काही जण खरेदी करिता येतात यामुळे दरवर्षी कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत वतीने नियोजन बाबत बैठक आयोजित केली जाते. शुक्रवारी देखील बैठक आयोजित केली होती.
कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत सभागृहात गणेश चतुर्थी नियोजन बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देवीदास गवस, मुख्य कार्यकारी अधिकारी संकेत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, प्रणय मोरजकर, एस टी विभाग कंट्रोल प्रमुख राजन धर्णे, तसेच व्यापारी संघ अध्यक्ष सागर सिरसाट, रिक्षा चालक, आरोग्य कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते .
दोडामार्ग शहरात गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी प्रमाणे नियोजन चर्चा झाली. बाजारपेठ मध्ये माटोळी सामान विक्री एका बाजूला तर दररोज रस्ता कडेला भाजीपाला इतर साहित्य विक्री करतात त्याना रस्ता सोडून बाजूला जागा देणे, एस टी बसेस जर रोजचा थांबा सोडून पुढे उभ्या कराव्यात तशा सूचना चालकांना द्यावे तसेच सूचना फलक लावण्यात यावे. ठरले.

शेअर करा