तातडीने हाफ तिकीट सुरू न केल्यास बुधवारी बस स्थानकातून एकही बस सोडू न देण्याचा इशारा
दोडामार्ग, दि.१ सप्टेंबर
मताचा जोगवा मागत लाडकी बहीण, बस मधून पन्नास टक्के सवलत इतर योजना गाजर दाखवून सत्तेवर आलेल्या महायुती सरकार मधिल परिवहन मंत्री तसेच सरकारने स्मार्ट कार्ड नाही तर हाफ टिकीट नाही. असे सांगून मंगळवार पासून हाफ टिकीट बंद केले आहे.
हिंदू म्हणून घेणाऱ्या सरकारने गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर हिंदू महिलांना हाप टिकीट नाकारले आहे. मराठी माणसावर लाथ मारली आहे यामुळे सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी तसेच राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी दोडामार्ग कंट्रोल प्रमुख यांची भेट घेऊन तातडीने हाफ टिकीट सुरू केले नाही तर बुधवारी दोडामार्ग बस स्थानकावरून एकही बस सोडणार नाही असा इशारा ठाकरे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी तसेच इतरांनी दिला.