प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने उपक्रम; पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांचा पुढाकार
कणकवली,दि.२५ ऑगस्ट
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने आणि यांच्या पुढाकाराने नांदगाव पंचक्रोशीतील असलदे येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
असलदे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.1, असलदे गावठण नं.2 , नवजीवन विद्यामंदीर असलदे तावडेवाडी या शाळांमघ्ये मंगळवारी मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.यावेळी कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , सरपंच चंद्रकांत डामरे , रघुनाथ लोके,वासुदेव दळवी, राजू राणे , हेमंत कांडर , सचिन लोके, प्रवीण डगरे , रामचंद्र जेठे, विजय खरात , अनिल नरे , पंकज आचरेकर, संदेश आचरेकर, उत्तम सावंत ,केंद्रप्रमुख मिनल तेली, मुख्याध्यापक दिनेश जंगले , सिताराम जंगले, मुख्याध्यापिका विनिता सावंत, शिक्षिका अर्चना लोके, ऋतुजा जंगले , श्री.राणे आदी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.