कणकवली : कोळोशी हडपीड येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

शेअर करा

प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने उपक्रम; पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांचा पुढाकार

कणकवली ,दि.२५ ऑगस्ट

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने आणि यांच्या पुढाकाराने नांदगाव पंचक्रोशीतील कोळोशी हडपीड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कोळोशी हडपीड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , कोळोशी या शाळांमघ्ये मंगळवारी मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.यावेळी कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर , सरपंच चंद्रकांत डामरे , पत्रकार उत्तम सावंत, हेमंत कांडर , प्रवीण डगरे , विजय खरात , अनिल नरे , शालेय शिक्षक आदी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा