कणकवली : तोंडवली – बावशी येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

शेअर करा

प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने उपक्रम; पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांचा पुढाकार

कणकवली,दि.२५ ऑगस्ट

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने आणि यांच्या पुढाकाराने नांदगाव पंचक्रोशीतील तोंडवली – बावशी येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
तोंडवली गावातील प्राथमिक शाळा, तोंडवली शाळा नं. १, तोंडवली बोभाटेवाडी, तोंडवली गावठण , बावशी नं.1 , बावशी शेळीची वाडी या शाळांमघ्ये मंगळवारी मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.यावेळी कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके नांदगाव सरपंच रविराज मोरजकर , तोंडवली बावशी उपसरपंच दिनेश कांडर, विलास कांडर , संतोष मिराशी , हेमंत कांडर , मारुती मोरये , शिक्षक जितेंद्र पेडणेकर, दिनेश पाटील, प्रकाश वाडकर , मैथिली पवार, निशा सावंत, महेश चव्हाण, धीरज जूंबे, अमोल कांबळे, अल्का कुटके, उत्तम सातवसे, साधना जाधव आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा