कणकवली,दि.२७ ऑगस्ट
श्री स्वामी समर्थ मठ, हडपिड येथे श्रावण महिन्यातील पवित्र गुरुवारचे औचित्य साधून १०१ स्वामी भक्तांचा सामूहिक महाअभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.
या महाअभिषेक सोहळ्यात १०१ स्वामी भक्तांनी श्रद्धापूर्वक सहभाग घेत स्वामी समर्थांची पूजा-अर्चा व अभिषेक केला. यावेळी संपूर्ण मठ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. स्वामी भक्तांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रभाकर राणे, विनोद आईर, दिलीप आईर, प्रदीप हरमलकर, विजय राणे, सचिन अदम, अनिल नरे, शिवलिंग जंगम यांच्यासह असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते.
श्रावण गुरुवारनिमित्त आयोजित या सामूहिक महाअभिषेक सोहळ्यामुळे हडपिड परिसरात आध्यात्मिक व भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.