कणकवली : तोंडवली-बावशी तंटामुक्ती अध्यक्षपदी हेमंत कांडर यांची बिनविरोध निवड

शेअर करा

कणकवली,दि.२७ ऑगस्ट

गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि तंटे सामोपचाराने मिटविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या तोंडवली बावशी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी हेमंत सुरेश कांडर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून हेमंत कांडर यांचे अभिनंदन करण्यात आले.

गावातील विविध प्रश्न सामंजस्याने सोडवून ग्रामस्थांमध्ये एकोपा व सलोखा कायम ठेवण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी सरपंचमनाली गुरव, उपसरपंच दिनेश कांडर, ग्रामसेवक श्री. चव्हाण, बुवा संतोष मिराशी, तात्या निकम, आबू मेस्त्री, चंद्रकांत बोभाटे, प्रमोद शेटये, प्रल्हाद कुडतरकर, पोलीस पाटील ,समीर मयेकर, कल्पना कांडर, श्री. तेली, संजय नाडकर्णी, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा