कणकवली : डीप लर्निंगच्या माध्यमातून ‘Sentiment Analysis’ विषयावर संशोधन सुप्रिया नलावडे यांना पीएच.डी. पदवी

शेअर करा

कणकवली,दि.२५ ऑगस्ट

संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात ‘Sentiment Analysis using Deep Learning’ या अत्याधुनिक विषयावर संशोधन पूर्ण करून सौ. सुप्रिया समीर नलावडे यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

सौ. नलावडे यांनी आपल्या संशोधनामध्ये Deep Learning, Convolutional Neural Network (CNN), Natural Language Processing (NLP) तसेच Optimization Techniques यांचा प्रभावी वापर करून Sentiment Analysis अधिक अचूक, कार्यक्षम आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने अभ्यास केला.

त्यांच्या संशोधनातील ALGO-DeAM या नाविन्यपूर्ण संशोधनाला सन २०२६ मध्ये Journal of Systems Science and Systems Engineering या प्रतिष्ठित संशोधन नियतकालिकात प्रकाशन मिळाले आहे. त्यांच्या संशोधन कार्याची ही विशेष शैक्षणिक आणि संशोधनात्मक कामगिरी मानली जात आहे.

या संशोधनासाठी त्यांना संजय घोडावत विद्यापीठातील मार्गदर्शक प्रा. डॉ. शामला आर. महाडिक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सुप्रिया नलावडे यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक व संशोधनात्मक यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठातील प्राध्यापक, सहकारी, कुटुंबीय तसेच मित्रपरिवारातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

शेअर करा