राजयोगिनी दादी प्रकाशमणी जी यांच्या १९व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
कणकवली ,दि. १९ ऑगस्ट
राजयोगिनी दादी प्रकाशमणी जी यांच्या १९व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात २१ ते २५ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘विश्व बंधुत्व रक्तदान महाअभियाना’तंर्गत कणकवलीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत जानवली, कणकवली येथील मारुती मंदिराच्या मागे असलेल्या ब्रह्माकुमारीज सेंटर येथे होणार आहे.
‘रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान द्या, आपले सहकार्य समाजासाठी अमूल्य ठरेल’ या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या अभियानाचे आयोजन समाज सेवा प्रभाग व ब्रह्माकुमारीज माउंट आबू (राजस्थान) यांच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन गरजू रुग्णांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रक्तदानासाठी नोंदणी व अधिक माहितीसाठी ९४२११४७७९७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.