शोधासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन
कुडाळ,दि.२८ ऑगस्ट
कुडाळ शहरातील खालची कुंभारवाडी येथील ५५ वर्षीय महिला घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याने ती बेपत्ता झाली आहे. उर्मिला उमेश कुंभार (वय ५५, रा. खालची कुंभारवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत महिलेचा शोध घेण्यात येत असून, तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उर्मिला कुंभार या २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घरातील कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या नातेवाईक तसेच परिचितांकडे चौकशी करून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
बेपत्ता महिलेने निळसर रंगाचा किंवा अन्य कोणत्याही रंगाचा गाऊन परिधान केलेला असण्याची शक्यता आहे. त्यांच्या गळ्यात काळ्या रंगाचा दोरा असून, त्याला काळ्या छोट्या मण्यांचे खोटे मंगळसूत्र आहे. या वर्णनावरून महिला कोणास आढळल्यास तिची ओळख पटविण्यास मदत होऊ शकते.
कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सदर महिला कोणासही दिसून आल्यास तिला सुरक्षित ठिकाणी थांबवून ठेवावे आणि विलंब न करता कुडाळ पोलीस ठाण्याला किंवा खालील संपर्क क्रमांकांवर माहिती द्यावी. कुडाळ पोलीस ठाणे : ०२३६२-२२२५३३, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर : ८६०५७२४१०५, युगा जळवी : ७०५८०७७०५१, सरस्वती कुंभार : ८३७८९६५३७४