कुडाळ : वेताळ बांबर्डेमध्ये ९ फुटी अजगराला जीवदान

शेअर करा

कुडाळ,दि.२६ ऑगस्ट

कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथील रहिवासी विनय बांबर्डेकर यांच्या घराकडील आवारात आलेल्या अजगराला शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. हा अजगर ९ फुटी अजगर आज दुपारी ३ च्या सुमारास विनय बांबर्डेकर यांच्या घराकडील आवारात आढळून आला. याची माहिती तत्काळ वनविभाग सावंतवाडी वनक्षेत्र कुडाळच्या
आरआरटी टीमचे रेस्क्युरर दिवाकर बांबर्डेकर यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत सर्पमित्र राजू माईणकर आणि तुषार नाईक यांच्या मदतीने अजगराला पकडले. आरआरटी टीमचे रेस्कुअर दिवाकर बांबर्डेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अजगर ९ फूट लांबीचा बिनविषारी साप प्रकारात मोडतो. मात्र, आपल्या भक्ष्यावर हा साप तत्काळ हल्ला करून चावा घेतो. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन दिवाकर बांबर्डेकर यांनी दिली.

शेअर करा