कुडाळ: वेताळ बांबर्डेमध्ये ९ फुटी अजगराला जीवदान

शेअर करा

कुडाळ,दि.२६ ऑगस्ट

कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील एका घराच्या आवारात आढळलेल्या अजगराला शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. हा अजगर ९ फुटी अजगर घराकडील आवारात आढळून आला. याची माहिती तत्काळ वनविभाग सावंतवाडी वनक्षेत्र कुडाळच्या आरआरटी टीमचे रेस्क्युरर दिवाकर बांबर्डेकर यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

शेअर करा