कुडाळ : वेताळ बांबर्डे गावातील वृद्ध महिलांना गणपतीपुळे-पावस तीर्थस्थळांचे दर्शन

शेअर करा

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून “दर्शन दौरा”

कुडाळ,दि.३१ ऑगस्ट

वेताळ बांबर्डे गावातील वृद्ध महिलांना खास श्रावण महिना असल्याने गणपतीपुळे आणि पावस या तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून एकदिवसीय “दर्शन यात्रा” आज आयोजित करण्यात आला. या महिलांना पूर्णतः मोफत या दोन्ही तीर्थस्थळांचे दर्शन करण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे या “दर्शन यात्रा” शुभारंभ वेतोबा मंदिर येथून कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आज करण्यात आला. यावेळी अवधुत सामंत, आरिफ मुजावर, कानू शेळके, बाबल बांबर्डेकर, दिनेश शिरवलकर यांच्यासहित एसटी चालक उपस्थित होते.
या दर्शन यात्रेत वेताळ बांबर्डे गावातील ३८ महिलांचा समावेश आहे. आज पूर्ण दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, पावससहित अन्य तीर्थक्षेत्रे यांचे दर्शन घेतले जाणार आहे.

शेअर करा