कुडाळ : पावशी येथे मालवाहू रिक्षाची दुचाकीला धडक; एक जखमी

शेअर करा

महामार्गावरील अपघातात दीपक वाळके जखमी; कुडाळ पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा व गुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू

कुडाळ,दि.२६ ऑगस्ट

महामार्गावर पावशी येथे मालवाहक रिक्षा टेम्पोने उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिल्याची घटना
आज रात्री ८.१५ च्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीवरील दीपक वाळके हा जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा नोंद सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, दुचाकीचालक दीपक वाळके हे बेलनदी येथे थांबून महामार्गाच्या बाजूला उभे होते. त्यावेळी कणकवलीकडे जाणाऱ्या मालवाहक रिक्षा टेम्पोने उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये मार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक देत दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाला.

शेअर करा