युवा उद्योजक आनंद शिरवलकर यांची मुख्य उपस्थिती
कुडाळ, दि.०३ सप्टेंबर
जय वेतोबा कला क्रीडा मंडळ, वेताळ बांबर्डे (ता. कुडाळ) जय वेतोबा गोविंदा पथक टी-शर्ट अनावरण कार्यक्रम बुधवारी पार पडला. युवा उद्योजक तथा वेताळ बांबर्डे गावचे सुपुत्र आनंद शिरवलकर यांची यावेळी मुख्य उपस्थिती होती. तर उद्योजक शैलेश बांबर्डेकर, जितेंद्र सावंत, उद्योजक प्रमोद गावडे, उपसरपंच शैलेश घाटकर, रामदास गावडे, आबा घाडी, सुहास गावडे, स्नेहा धुरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील नंबर १ चे गोविंदा पथक
असलेल्या जय वेतोबा गोविंदा पथकाने मागील १० ते १२ वर्षात उल्लेखनीय कार्य केले आहे. जिल्ह्यात दहीहंडीचे तब्बल ६ थर लावून ख्याती मिळवली आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जपत असताना या पथकाकडून विविध घटकांना मदतकार्य केले आहे.
यावेळी युवा उद्योजक आनंद शिरवलकर यांच्या हस्ते प्रतिकात्मक हंडी फोडून नंतर टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. यावेळी आनंद शिरवलकर म्हणाले की, मागील काही वर्षात जय वेतोबा कला-क्रीडा मंडळाच्या वेताळ बांबर्डे जय वेतोबा गोविंदा पथकाचे कार्य जिल्ह्यात उल्लेखनीय ठरत आहे. आजवर अशी जिल्ह्यात अनेक गोविंदा पथके निर्माण झाली जी जास्त प्रगती करू शकली नाही. पण जय वेतोबा गोविंदा पथका आपल्या साहसी खेळात कायमस्वरूपी ठसा उमटविला आहे. त्यामुळे आपण या पथकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून सर्वोतोपरी सहकारी करू, अशी ग्वाही दिली. यावेळी वेताळ बांबर्डे नागरिक तसेच पुरुष आणि महिला दहीहंडी पथकातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.