महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांची ट्विटरवर माहिती;मंत्री नितेश राणे यांचाही माहिती
कुडाळ,दि.०३ नोव्हेंबर
नवी मुंबई ते सिंधुदुर्ग चिपी अशी विमानसेवा दररोज सुरू होणार असून याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी आज आपल्या ट्विटर अकाउंटवर दिली आहे. याला मंत्री नितेश राणे यांनीही ही माहिती दिला. यानुसार, नवी मुंबई ते चिपी ही विमानसेवा दररोज सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी नवी मुंबई येथून निघून सिंधुदुर्ग चिपी येथे सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. तर चिपी विमानतळावरून सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी निघून नवी मुंबई येथे सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी पोहोचणार आहे. लवकरच नवी मुंबई-चिपी-नवी मुंबई विमानसेवा सुरु होण्याची तरीही जाहीर केली जाईल.
