कुडाळ : पणदूर तिठा हायस्कूलमध्ये शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम २०२६ व वाचन स्पर्धा २०२६ बक्षीस वितरण समारंभ

शेअर करा

कुडाळ,दि.१५ ऑगस्ट

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी, पणदूर तिठा येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम २०२६ व वाचन स्पर्धा २०२६ बक्षीस वितरण समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


यावेळी प्रशालेचे माजी सहा. शिक्षक जी. आर. पटवर्धन सर कुटुंबीय यांच्याकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती कु. विहार विनायक तवटे इ. ५ वी, कु. पुष्पक सुधाकर उघडे इ. ७ वी, कु. मानसी रवींद्र बांबर्डेकर इ. ५ वी कु. खुशी शैलेश कुंभार इ. १० वी, कु. मानव महेश यादव इ. १० वी, तन्मय महेश भाले इ १० वी यांना प्रत्येकी ५०० प्रमाणे प्रदान करण्यात आली .


तसेच जी.आर. पटवर्धन सर यांच्या वतीने मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या वाचन स्पर्धा २०२६ मध्ये कु. स्वतेजा मानसिंग पाटील ५० पुस्तके, सलोनी सतीश वाखाले ४७ पुस्तके, मनवा मिलिंद घोगळे ३४ पुस्तके, निर्मिती राजन नाईक ३४ पुस्तके, प्रांजली हरिश्चंद्र कदम ३१ पुस्तके, रुची गौरीश कुंभार २७ पुस्तके, ईशान सुनील बांदेकर २६ पुस्तके, समृद्धी संजय गावडे २६ पुस्तके, गायत्री संतोष म्हापणकर २६ पुस्तके, ईश्वरी गंगाराम पालव २६ पुस्तके, मंजिरी महादेव गोसावी २५ पुस्तके, पूर्वी गौरीश कुंभार २५ पुस्तके, या विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे केवळ वाचन नाही तर प्रत्येक पुस्तका संदर्भात आपला अभिप्रायही नोंदवला. या विद्यार्थ्यांना जी. आर. पटवर्धन सर यांच्या वतीने रोख रक्कम व वस्तुरूप भेटवस्तू देण्यात आल्या.


या कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष मान. आपा गावडे , सचिव नागेंद्र परब, सहसचिव जयभारत पालव, खजिनदार सुधाकर वळंजु, संचालक पाटील सर, प्रशालेचे मुख्याध्यापक एम. जी. कर्पे, पर्यवेक्षिका दाभोलकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांनी जी. आर. पटवर्धन सर यांचे व त्यांच्या कुटुंबीयांप्रति आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान पाटील सर यांनी केले. आभार दाभोलकर यांनी मानले.

शेअर करा