२९ ते ३१ ऑगस्ट कालावधीत महालक्ष्मी हॉल येथे आयोजन
कुडाळ,दि.२७ ऑगस्ट
स्थानिक उद्योजकांना एकत्रित करत त्यांना त्यांच्या उद्योग वाढीसाठी चालना देण्यासाठी तसेच स्थानिक ग्राहकांना उत्तम दर्जाच्या वस्तू योग्य दरात उपलब्ध करून देत स्थानिक उद्योजक विशेषत: महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे या सहकार्याच्या उद्देशाने गेली ७ वर्ष “नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थे”च्या माध्यमातून
“खरेदी महोत्सव”
आयोजित करण्यात येतो. यंदाही २९, ३० आणि ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते रात्री ९ पर्यंत महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे गणेशोत्सवानिमित्त विशेष प्रदर्शन आणि खरेदी महोत्सव २०२६ आयोजित केला आहे.
“व्होकल फॉर लोकल” स्थानिकांना बाजारपेठ मिळवून देण्याचा संकल्प करत अविरत हे कार्य आमच्या “नर्मदाआई” संस्थेच्या वतीने सुरु आहे. एक खारीचा वाटा देश घडविण्यात या उद्योजकांचा पण निश्चितच आहे.
“नर्मदाआई” आयोजित गणेशोत्सवानिमित्त खरेदी महोत्सवला
आवर्जून भेट द्या खरेदी चा एकाच छताखाली आनंद लुटा, आपली उपस्थिती आमच्या उद्योजकांना नक्कीच प्रोत्साहन देणारी ठरेल, तरी या महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.