उबाठा शिवसेना महिला आघाडी व बंड्या सरमळकर आयोजित स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण ,दि.२८ ऑगस्ट
नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण महिला आघाडी आणि बंड्या सरमळकर मित्रमंडळाच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या नारळ लढविणे स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत कशिश पराडकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर सौ. मनीषा सोनावडे यांनी द्वितीय क्रमांक आणि प्रांजली लाड यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक, त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास फ्रिज, द्वितीय विजेत्यास एअर फ्रायर, तृतीय क्रमांकास मिक्सर अशी बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यानिमित्त घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत अस्मि सुधीर भगत हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच आराध्या वसंत टेमकर हिने द्वितीय क्रमांक आणि सावी वसंत कांदळगावकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. त्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन रोहन कदम, लारा मयेकर यांनी केले. यावेळी उबाठा शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, बंड्या सरमळकर, युवासेना तालुका समन्वयक, नगरसेवक मंदार ओरसकर, नगरसेवक तपस्वी मयेकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, नगरसेविका अनिता गिरकर, नंदिनी नाईक, राजवर्धन नाईक, महेश जावकर, उमेश मांजरेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, उपतालुकाप्रमुख रश्मी परुळेकर, शहर संघटक राधिका मोंडकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, रूपा कुडाळकर, गौरी सावंत, स्मिता सरमळकर, माधुरी प्रभू, आकांक्षा शिरपुटे, तृप्ती मयेकर,सोनाली खोबरेकर, संजना रेडकर, युवासेना शहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर, मनोज मोंडकर, अन्वय प्रभू, राहुल सावंत, सुधीर परब, प्रथमेश सरमळकर, बबन वाघ, आर्या गावकर, दिपा जावकर, योगिता गावकर, बाळा मिटकर, अक्षय रेवंडकर, फिलसू फर्नांडिस, सुरेश मर्ये आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे सूत्रसंचालन रोहन कदम, लारा मयेकर यांनी केले.