नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटीवर रंगली भव्य स्पर्धा; आठही विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव
मालवण,दि.२८ ऑगस्ट
महायुतीच्या वतीने आयोजित आणि आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटी येथे भव्यदिव्य स्वरूपात रंगलेल्या महिला नारळ लढविणे स्पर्धेत मधुरा मयेकर विजेत्या ठरल्या. तर भाग्यश्री माळकर यां द्वितीय क्रमांक मानकरी ठरल्या. यांसह हर्षदा खुरंदळे (तृतीय), संजना मेस्त्री (चतुर्थ), परी सावजी (पाचव्या), सालिया शेख (सहाव्या), गार्गी मोंडकर (सातव्या), संजना जुवाटकर (आठव्या) अश्या अनुक्रमे आठही विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सोन्याची नथ, मानाची पैठणी आणि फ्रिज, द्वितीय क्रमांक वॉशिंग मशीन, तृतीय क्रमांक चांदीचा कुंकवाचा करंडा, चतुर्थ क्रमांक चांदीचा छल्ला, पाचव्या व सहाव्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी मिक्सर व सातव्या व आठव्या क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात आले. यांसोबतच लकी ड्रॉ कुपन मधून 20 स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.
शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटी येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या महिला नारळ लढविणे स्पर्धेने उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. स्पर्धेला महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सभापती प्रज्ञा चव्हाण, स्वप्नाली नेरुरकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरपरिषद महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, शिवसेना महिला आघाडी संघटक तथा नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हाप्रमुख निषय पालेकर, शिवसेना तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, नगरसेविका मेघा सावंत, नीना मुंबरकर, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर, ललित चव्हाण, मार्टिना फर्नांडिस, प्रियांका मेस्त्री, रश्मी तुळसकर, अर्चना मिठबावकर, तारका चव्हाण, महिमा मयेकर, अमृता फाटक, अंजना सामंत, दिक्षा गांवकर, दिव्या कोचरेकर, शाम वाक्कर, राजू बिडये, अखिलेश शिंदे, मनोज हडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीच्या वतीने आयोजित या महिला नारळ लढविणे स्पर्धेला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक नारळी पौर्णिमा उत्सवात महिलांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. स्पर्धेतील प्रत्येक फेरीत वाढत जाणारी चुरस आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे बंदर जेटीवर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.