मालवण : रेकोबा विद्यालयाची बुद्धिबळ स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

शेअर करा

सिया परब द्वितीय, योगिता जोशी तृतीय; वेद कुबलला चौथा क्रमांक — तिन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

मालवण,दि.१२ सप्टेंबर

क्रीडा व युवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदूर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदूर्ग, व मालवण क्रीडा समिती ,मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने वराड हायस्कूल वराड येथे झालेल्या मालवण तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मालवण वायरी भूतनाथ येथील रेकोबा माध्यमिक विद्यालयाने नेत्रदीपक कामगिरी बजावली या प्रशाळेच्या कुमारी सिया गणेश परब हिने १९ वर्षाखालील मुलींच्या गटात द्वितीय तर कुमारी योगिता रामचंद्र जोशी हिने तृतीय क्रमांक क्रमांक पटकावीला तसेच १९ वर्षाखालील मुलगे गटात कुमार वेद प्रवीण कुबल याने चतुर्थ क्रमांक मिळविला या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे

या विध्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्रीनाथ फणसेकर व प्रवीण कुबल यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या सर्व विध्यार्थ्यांचे चांगली कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी,शालेय समिती पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक श्री संजय खोचरे , पालक शिक्षक संघ, पदाधिकारी, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग ,विद्यार्थी वृंद यांनी अभिनंदन केले आहे

शेअर करा