सावंतवाडीच्या मोती तलावात अचानक मासे पाण्यावर; नेमके कारण काय?

शेअर करा

रात्रीच्या वेळी मासे मोठ्या संख्येने पाण्याबाहेर आल्याने खळबळ; तलावाच्या पाण्याखाली काय घडले?

सावंतवाडी,दि.२७ ऑगस्ट

शहरातील मोती तलावात काल रात्री अचानकपणे मासे पाण्याबाहेर आले. रात्रीच्या सुमारास तलावातील हे मासे पाण्यावर तरंगू लागले. त्यामुळे हे मासे वर का आले असतील ? पाण्याखाली काय घडलं असेल ? असे प्रश्न निर्माण झालेयत.

काल रात्री उशीरा हा प्रकार समोर आला. तलावातील मासे अचानकपणे पाण्यावर आले. हा प्रकार नेमका कशामुळे घडला हे समजू शकलेल नाही. मात्र, मोती तलावात निर्माण झालेलं झाले अस्वच्छतेच साम्राज्य, तलावात कांहीकडून सोडल्या जाणाऱ्या गढूळ पाण्यामुळे हिरवगार झालेले पाणी हेच यामागचे एक मुख्य कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर याबाबत विचारलं असता नगरपरिषदेच्या कर्मचारी वर्गाकडून सफाई सुरू असल्याचे सांगितले गेले.

शेअर करा