गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत २९ ऑगस्टला पोलिसांची महत्त्वाची बैठक

शेअर करा

पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; सामाजिक संघटना, युनियन व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण

​सावंतवाडी,दि.२६ ऑगस्ट
आगामी गणेशोत्सवाचा सण शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी, दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ११ वाजता एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस शहरातील सर्व सामाजिक संघटना, विविध युनियन आणि संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
​या पार्श्वभूमीवर, ‘ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटना, सावंतवाडी’च्या सर्व स्टँड प्रतिनिधींनी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे, असे अधिकृत आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी केले आहे.
​गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रिक्षा संघटनेचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तरी संघटनेच्या सर्व स्टँड प्रतिनिधी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीस वेळेवर व बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रिक्षा युनियनचे सरचिटणीस सुधीर पराडकर यांनी केले आहे.

शेअर करा