सावंतवाडी: नेमळे धनगरवाडीला साधी पायवाटही नाही; ग्रामस्थांचे हाल

शेअर करा

शाळकरी विद्यार्थी, महिला व वृद्धांना मोठा त्रास; आजारी रुग्णाला ५०० मीटर उचलून रस्त्यापर्यंत आणण्याची वेळ

सावंतवाडी,दि.२६ ऑगस्ट
नेमळे गावातील गावकर कुंभारवाडी मधील धनगरवाडि या या वाडीवर जाण्या येण्यासाठी साधी पायवाट ही नसल्याने या वाडीवरील शाळकरी विद्यार्थी,महिला, तसेच वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे एखाद्या आजारी रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जायचे असेल तर रुग्णाच्या घराकडून पाचशे मीटर अंतरावर ग्रामीण रस्त्यापर्यंत रुग्णाला उचलून आणावे लागते त्यानंतर रिक्षातून रुग्णालयात घेऊन जावे लागते अशी परिस्थिती नेमळे धनगरवाडी लोकवस्ती मधील लोकांची आहे रस्त्यांदर्भातील आम्हाला होणारा त्रास आम्ही कोणाकडे व्यक्त करावा आणि आम्हाला कोण मदत करणार याकडे धनगरवाडी लोकवस्ती मधील लोकं प्रतीक्षा करत आहेत
लोकसभा, विधानसभा,जिल्हापरिषद,ग्रामपंचायत अशा प्रकारच्या निवडणुका आल्या की सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांना एक गठ्ठा मते कुठे मिळतील तर ती धनगर वाडीमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाची माणसे सभा घेऊन यावर्षी अमुक योजनेमधून तुमचा रस्ता मंजूर झालेला आहे आणि आम्हीच तो करून देऊ शकतो अशी पोकळ आश्वासने देऊन तसेच पैशाच्या आमिषाना बळी पाडले जाते निवडणूक झाली की पाच वर्ष या वाडीकडे कोणीच ढुंकूनही बघत नाही आपल्या फायद्यासाठी वापरायचं नि फेकून द्यायचं, अशी परिस्थिती या वाडीवर दिसून येत आहे आज तीस वर्षे या धनगरवाडी समाजाची गावातील कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्या कडून वारंवार फसवणूक केली जाते आमच्या या रस्त्याविषयी आम्ही जाब विचारायचा झाला तर तो कोणाला विचारायचा आणि आमचा धनगर समाजाचा रस्ता कोण करून देणार याच प्रतिक्षेत नेमळे धनगरवाडी समाज आपल्या वाटेकडे डोळे लावून वाट बघत आहेत.

शेअर करा