सावंतवाडी : आरोंदा हायस्कूलमध्ये राऊत कंपनी व रो-वस्त्रकडून विद्यार्थ्यांना छत्री वाटप

शेअर करा

सावंतवाडी,दि.२६ ऑगस्ट

आरोंदा हायस्कूलमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राऊत आणि कंपनी तसेच रो-वस्त्र यांच्या माध्यमातून छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रशालेतील सुमारे १०० विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना छत्र्या देण्यात आल्या.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. उपस्थित मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुजाता परब होत्या.
यावेळी आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदेश परब, उपाध्यक्ष रघुनाथ (बबन) नाईक, रो – वस्त्र चे रोहन परब,सचिव वासुदेव (भाई) देऊलकर, खजिनदार रुपेश धर्णे, सदस्य रामचंद्र कोरगांवकर, स्नेहा गडेकर, ग्रामपंचायत आरोंदाच्या प्रशासक सायली साळगांवकर, स्मिताली नाईक, सुभद्रा नाईक, शिल्पा नाईक, नरेश देऊलकर, पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष भाग्यश्री रेडकर, सदस्य गौरी नाईक, शिक्षणप्रेमी विद्याधर नाईक, सेवानिवृत्त शिक्षक बाळा आरोंदेकर, शांताराम परब, नयन चोडणकर ,चंदन गोसावी आदी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना संदेश परब म्हणाले की, राऊत आणि कंपनी तसेच रो-वस्त्र यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आरोंदा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. यापुढेही प्रशालेला सहकार्य करण्यात येईल. शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. रो-वस्त्रचे रोहन परब यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया कोरगांवकर व शिक्षक ताराचंद राठोड यांनी केले, तर आभार बाळा आरोंदेकर यांनी मानले. कार्यक्रमास प्रशालेचे शिक्षक, पालक, ग्रामस्थ व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा