सावंतवाडी,दि.२६ ऑगस्ट
रो. दिलीप म्हापसेकर यांना मातृशोक. दि. 22 ऑगस्ट रोजी त्यांच्या आई लक्ष्मी यांचे त्यांच्या 92 व्या वर्षी अल्पशा आजाराने बेळगाव येथे निधन झाले. त्या देवगडच्या पारकर कन्या असून त्यांचा विवाह कर्नाटकातील कॅसलरॉकचे झिलू म्हापसेकर यांच्याशी विवाह झाला. त्या त्याकाळातील SSC असून,त्याना वाचन आणि संगीत यात विशेष आवड होती. त्यांना रो.दिलीप आणि संदीप मुले असून सुना, नातसून, नातंवंडे आणि पंतवंडे देखील आहेत.