सावंतवाडी : माजगाव येथे कुत्र्यांच्या तावडीतून सांबराला वाचवले; सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदकर यांची प्रसंगावधानता

शेअर करा

सावंतवाडी, दि. २६ ऑगस्ट
माजगाव येथे मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या एका सांबराला सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदकर यांच्या प्रसंगावधानतेमुळे जीवदान मिळाले.
​माजगाव दत्त मंदिर आणि मेटवाडा परिसरात ७ ते ८ मोकाट कुत्र्यांनी एका सांबराचा पाठलाग करून त्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न सुरू केला होता. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे सांबार अत्यंत भयभीत झाले होते. हा प्रकार निदर्शनास येताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कुत्र्यांना पळवून लावले आणि सांबाराचा जीव वाचवला.
​त्यानंतर खंदकर यांनी तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सांबराला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्त केले.
​जयेश खंदकर यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि प्राणीदयेबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

शेअर करा