सावंतवाडी,दि.२६ ऑगस्ट
सावंतवाडी तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेची ३२ वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी संस्थेच्या कार्यालयात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेच्या सुरुवातीला दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा सौ. कीर्ती किशोर बोंद्रे यांनी उपस्थित सभासद व मान्यवरांचे स्वागत केले.
संस्थेच्या व्यवस्थापिका सौ. वृंदावनी वर्णेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून ते कायम केले. सभेमध्ये सन २०२५-२६ चा वार्षिक अहवाल, तेरीज, नफा-तोटा व ताळेबंद पत्रकाचे वाचन करण्यात आले, तसेच सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
या प्रसंगी शैक्षणिक यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. यामध्ये दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कु. नेहल देवेंद्र तुळसकर व कु. नक्षत्रा गोविंद वर्णेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ. कीर्ती बोंद्रे यांची कन्या कु. एकता किशोर बोंद्रे हिने एम.सी.ए. (MCA) पदविका प्राप्त केल्याबद्दल तिचा विशेष गौरव करण्यात आला.
सभेच्या निमित्ताने उपस्थित महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. माधुरी गोविंद वाडकर यांनी केले. या वार्षिक सभेस संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.