सावंतवाडीत बेकायदेशीर बंदुका अन् खवले मांजराच्या खवल्यांसह ताब्यात घेतलेल्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी

शेअर करा

सावंतवाडी,दि.२६ ऑगस्ट
देवसू आणि दाणोली परिसरात सावंतवाडी पोलिसांनी केलेल्या विशेष छापामारीत ४ बिगरपरवाना बेकायदेशीर बंदुका आणि खवले मांजर या संरक्षित प्राण्याचे १५४ खवले जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली होती, न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
​पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पथकांनी देवसू पलीकडचीवाडी, जाधववाडी आणि दाणोली गावठणवाडी येथे ही धडक कारवाई केली. या छाप्यात सुमारे ७० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी गजानन उर्फ अर्जुन सावंत, अशोक सावंत, संतोष जाधव आणि सुरज सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता चौकशीसाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

शेअर करा