सावंतवाडी: आंबेगाव शाळा नं-1च्या कब पथकाचे राज्यस्तरावर घवघवीत यश

शेअर करा

राज्यस्तरिय स्काऊट, कब आणि बुलबुल चाचणी परीक्षेत प्राथमिक विभागातून सहभागी झालेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव आणि पहिली शाळा होण्याचा मान

सावंतवाडी,दि.०२ सप्टेंबर

जि.प.पू.प्राथमिक शाळा आंबेगाव नं.1च्या ‘शिवरत्न संभाजी कब पथका’ने मार्च 2026 मध्ये सोनतळी, कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय चतुर्थ चरण कब चाचणी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले आहे.
इयत्ता तिसरी व चौथीतील चिमुकल्या कबनी आपल्या कौशल्याचे आणि शिस्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत हे उल्लेखनीय यश संपादन केले.
शाळेचे कब मास्टर श्री.नितीन नामदेव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कु.मयंक महादेव निरुकेकर, नितेश नामदेव शेळके, शौर्य सावळाराम जाधव, स्वरूप न्हानू आंगचेकर, सचिन सुमित दळवी, यज्ञेश उमेश गवळी, चैतन्य उत्तम सावंत, स्वराज प्रदीप सावंत या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय चाचणी परीक्षा यशस्वी रित्या उत्तीर्ण केली. त्याच बरोबर या शाळेच्या बुलबुल पथकातील कु. प्रिया शंकर राणे, त्रिशा तेजस गावडे, समृद्धी सचिन चव्हाण यांनी सुद्धा राज्यस्तरीय चतुर्थ चरण बुलबुल चाचणी परीक्षा यशस्वी रित्या उत्तीर्ण केली आहे. या विद्यार्थिनीना फ्लॉक लिडर श्रीम. निता नितीन सावंत यांचं मार्गदर्शन लाभले.तसेच राज्यस्तरीय स्काऊट राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेत शाळेचे स्काऊर मास्टर श्री.नितीन नामदेव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेच्या स्काऊट पथकातील कु तनिश तेजस गावडे, प्रविण सिताराम जंगले, भावार्थ नवलू झोरे, आर्यन रवि गावडे या विद्यार्थ्यांनी यश संपादित करत आंबेगाव शाळा नं-1 ने यावर्षी राज्यस्तरीय स्काऊट,कब आणि बुलबुल चाचणी परीक्षेत सहभागी होणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली प्राथमिक शाळा होण्याचा मान मिळवला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड जिल्हा संघटक श्रीम.अंजली माहुरे, स्काऊट मास्टर श्री.अरविंद मेस्त्री सर,श्री.प्रदीपकुमार म्हाडगुत सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या या उल्लेखनीय राज्यस्तरीय यशाबद्दल कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.संदीप निऊंगरे,आंबेगाव सरपंच श्री. शिवाजी परब, उपसरपंच श्री. रमेश गावडे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती तेजस्वी गावडे,उपाध्यक्ष श्री.संदेश कारिवडेकर, शिक्षण तज्ज्ञ श्री.राहुल राणे,पोलीस पाटील श्री.लक्ष्मण गावडे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री.संतोष राणे,ग्रा.पं.सदस्य श्री. योगेश गवळी, श्रीम.साक्षी राऊळ, श्रीम.प्रणाली परब,ग्रामसेवक श्री. जाधव,शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रदीपकुमार म्हाडगुत,शिक्षक वृंद तसेच पालक आणि ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा