शिवप्रेमी मित्रमंडळाचा पुढाकार; रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी समई नृत्य स्पर्धेसह आकर्षक लकी ड्रॉचे आयोजन!
वेंगुर्ला,दि.०२ नोव्हेंबर (प्रथमेश गुरव)
दिपावलीनिमित्त शिवप्रेमी मित्रमंडळ माणिक चौक यांच्यावतीने ८ ते १० नोव्हेंबर या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ८ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन संस्कार भारती रांगोळी स्पर्धा, दि.१० नोव्हेंबर रोजी माणिक चौक येथे सायंकाळी ६ वाजता संस्कार भारती रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ, त्यानंतर सायंकाळी ७ वाजता महिलांसाठी आकर्षण ठरणारी समई नृत्य स्पर्धा रंगणार आहे. या कार्यक्रमाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे प्रेक्षकांसाठी आकर्षक लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे. यातून कार्यक्रमस्थळी उपस्थित रसिक प्रेक्षकांना आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे.
तरी वेंगुर्ला व परिसरातील सर्व रसिक प्रेक्षकांनी या सांस्कृतिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.