​सावंतवाडीत भंडारी समाज पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सभा उत्साहात

शेअर करा

सलग १५ वर्षे ‘अ’ ऑडिट वर्ग कायम राखल्याबद्दल संचालकांचे अभिनंदन

​सावंतवाडी,दि.२१ जुलै
भंडारी समाज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सावंतवाडीची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खासकीलवाडा येथील भंडारी भवन येथे संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. संस्थेने सलग १५ वर्षे ‘अ’ ऑडिट वर्ग कायम राखत दरवर्षी लाभांश वाटपाची परंपरा जपल्याबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त करत सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव संमत केला.
​सभेच्या प्रारंभी संचालक संजय पिळणकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि दिवंगत सभासद, खातेदार, ठेवीदार व मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांनी संस्थेची आर्थिक प्रगती, आगामी विकास आराखडा व नवीन योजनांची माहिती देऊन संस्था अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला.


​यानंतर व्यवस्थापक दीपक सरमळकर यांनी कामकाजास सुरुवात केली. सभेमध्ये सभासद संतोष वैज, राजेंद्र बिर्जे, सुमन सुभेदार, महेश कांबळी, रमेश पई, देविदास आडारकर, नंदकिशोर कोंडये, भरत कांबळी, प्रतिभा कांबळी, रोहिणी म्हापसेकर, दर्क्षणा पेडणेकर, अपेक्षा साटेलकर, दीपक जोशी, दर्शना राणे, निलेश कुडव, प्रदीप नाईक, दिलीप पेडणेकर, सीताराम पेडणेकर, गुरुप्रसाद वाडकर, सुरेश राऊळ, कृष्णा धुरी, विद्याधर आडारकर यांनी विविध विषयांवर सूचना व ठराव मांडले. चर्चेनंतर सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.


​संचालक मंडळ, कर्मचारी आणि अल्पबचत प्रतिनिधींच्या समर्पित कार्यामुळेच संस्थेचा आर्थिक आलेख उंचावत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.


​या सभेला अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, संचालक चंद्रशेखर पेडणेकर, अशोक बुगडे, गुंडू साटेलकर, कमलाकांत मुंडये, समता सूर्यजी, वैशाली पटेकर, संजय पिळणकर, रामचंद्र कोचरेकर, व्यवस्थापक दीपक सरमळकर, लिपिक सुनील दळवी, देवता पेडणेकर, अल्पबचत प्रतिनिधी संजना धुरी, शंकर नाईक व आवर्त ठेव प्रतिनिधी सरिता मुननकर यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​सभेनंतर पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थी सन्मान समारंभाचे प्रभावी सूत्रसंचालन संचालक संजय पिळणकर यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली.

शेअर करा