सावंतवाडी : नेमळे हायस्कूलसमोर गतिरोधकाची मागणी

शेअर करा

सावंतवाडी,दि.१ सप्टेंबर

वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गावर असलेल्या नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नेमळे येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव सिताराम घोगळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी सावंतवाडी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन दिले आहे.

नेमळे हायस्कूलमध्ये सध्या सुमारे ३२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही शाळा थेट राज्यमार्गाला लागून असून हा रस्ता जवळपास एक किलोमीटरपर्यंत अगदी सरळ आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणारी लहान-मोठी वाहने अत्यंत सुसाट वेगाने जातात. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. मात्र, शाळा परिसर असूनही अनेक चालक वाहनांचा वेग कमी करत नसल्याने येथे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

भविष्यात होणारी संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना तातडीने गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग पट्टे आणि आवश्यक सूचना फलक बसवण्यात यावेत. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या जागेची तत्काळ पाहणी करावी आणि उपाययोजना करावी, अशी मागणी वैभव घोगळे यांनी केली आहे.

शेअर करा