सावंतवाडीत २३ जुलै रोजी खाद्यव्यावसायिकांसाठी ‘अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र’ कार्यक्रम

शेअर करा

सावंतवाडी,दि.२१ जुलै
सावंतवाडी तालुका व्यापारी उद्योजक व व्यावसायिक संघ, सावंतवाडीतर्फे गुरुवारी, २३ जुलै रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत विशेष ‘अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडणार आहे.


​या प्रशिक्षण शिबिरात पुण्यातील खाद्यपदार्थ तज्ज्ञ, अन्न पदार्थ सल्लागार व प्रशिक्षक अंकुश जोगदंड उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरादरम्यान सुरक्षित अन्न, प्रमाणपत्र वितरण, आरोग्य संरक्षण आणि या क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन केले जाईल.


​या कार्यक्रमात किराणा, हॉटेल, खानावळ, बेकरी, मिठाई, कोल्ड्रिंक्स, स्टॉल व्यावसायिक, मासे, चिकन, अंडी, मटन विक्रेते, दुध विक्रेते, चायनीज विक्रेते, फरसाण भट्टी, वडापाव, समोसा, भजी, चहा विक्रेते, कॅटरिंग व्यावसायिक, तसेच विविध धान्यांपासून पीठ तयार करणारे आणि बाटलीबंद पाणी व पाणी विक्री करणाऱ्या सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.


​संबंधित सर्व व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून शिबिराला उपस्थित राहावे. कार्यक्रमात नोंदणीसाठी आधार कार्ड व त्याच्या झेरॉक्स प्रतीसह उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी केले आहे.

शेअर करा